Prakash Mahajan VS Narayan Rane : “मी घाबरणारा नाही, तुमचं बिळ उद्ध्वस्त करीन!” — प्रकाश महाजनांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर :- राज ठाकरे Raj Thackeray यांच्यावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्यावर आणि त्यांच्या पुत्रांवर चिखलफेक करणाऱ्यांवर सडकून टीका करत थेट आव्हान दिलं आहे. “तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आहे, मी राज ठाकरे Raj Thackeray यांचा खरा कार्यकर्ता आहे,” अशा शब्दांत त्यांनी राणेंना इशारा दिला आहे. त्यांच्या या भाष्यांनंतर त्यांना सतत धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
महाजन यांनी या धमक्यांना भीक न घालता थेट छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अर्धा तास आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ते म्हणाले, “माझं घर कुठं आहे, हे सांगायला मी तयार आहे. जर मला मारहाण करून तुमचं समाधान होत असेल, तर मी तयार आहे. पण राज ठाकरे यांच्यावर अश्लील भाषा वापरणाऱ्यांना मी गप्प बसू देणार नाही.”
राणेंच्या टीकेला आक्रमक प्रत्युत्तर
नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांच्यावर व्यक्तिशः हल्ला चढवत विचारलं की, “प्रकाश महाजन कोण आहेत? त्यांनी समाजकारणात, राजकारणात काय योगदान दिलंय?” इतकंच नव्हे, तर “तोंडाचा वापर करताना आपल्या लायकीची जाणीव ठेवावी,” असा टोला राणेंनी लगावला होता. तसेच, “राणेंच्या रस्त्यात आलात तर योग्य रस्ता दाखवतो,” असंही स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं.
याला प्रत्युत्तर देताना प्रकाश महाजन यांनी राणेंच्या कुटुंबीयांवरही टीका केली. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेची खिल्ली उडवणाऱ्या नीतेश राणेंची वैचारिक उंची उभी राहिली तर लवंग, बसली तर विलायची एवढी आहे,” असा तिरकस हल्ला करत त्यांनी भाजपला सत्तेच्या माजातून उतरवण्याची भाषा केली.
राणेंनी स्वतःच आपल्या मुलांचे कान टोचायला हवे होते”
महाजन यांनी नारायण राणेंना उद्देशून सांगितलं की, “उद्धव ठाकरे हे तुमच्या वयाचे आहेत. अशा मोठ्या व्यक्तींविषयी नीतेश राणे एकेरी भाषेत बोलतात आणि तुम्ही गप्प का? तुमचंच कर्तव्य होतं की मुलांचे कान टोचावेत आणि योग्य भाषा शिकवावी.” या वक्तव्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…