मुंबई

Bakra Eid 2025 : बकरीदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले; मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

Bakra Eid 2025 : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : बकरीदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कुर्बानीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. Bakra Eid 2025 या बैठकीस राज्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार असून, विविध ठिकाणी कुर्बानीसंदर्भात होणाऱ्या वादांना थांबवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचा प्रयत्न आहे.

अल्पसंख्यांक आयोगाचे आवाहन – “कुर्बानी इस्लामी सिद्धांतांनुसार, पण कायद्याच्या चौकटीत”

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सूचक विधान करत मुस्लिम समाजाला आवाहन केलं आहे की, “कुर्बानी इस्लामी तत्त्वांप्रमाणे व्हावी, पण कुणालाही त्रास होणार नाही याची खात्री असावी. कुर्बानी फक्त त्या ठिकाणी करावी जिथे स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. नियमांचं पालन केल्याशिवाय अल्लाह कुर्बानी स्वीकारणार नाही.”

मुंबईत हाउसिंग सोसायट्यांमध्ये कुर्बानीवरून पूर्वीपासून वाद होत असून, यंदाही तणाव जाणवतोय. देवनार बकरा मार्केटला सरकारने सुविधा न दिल्याचा आरोप करत काँग्रेस नेते आज प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावर भाजपने काँग्रेसवर ‘केवळ मुस्लिम मतांसाठी प्रेमाचा दिखावा’ करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही हस्तक्षेप करत, “देवनारमध्ये महादेव असो वा परवेज – सगळ्यांच्या अडचणी सारख्याच आहेत. शासनाने भेदभाव न करता तातडीने उपाययोजना करावी,” अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0