Pradeep Sharma Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
•Pradeep Sharma Case मुंबई हायकोर्टाने जन्मठेप शिक्षा सुनावलेल्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा कायमचा जामीन मंजूर
ANI :- एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून ही शर्मा यांना दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच 19 मार्चला मुंबई हायकोर्टाने जन्मठेपची शिक्षा सोनाली होती. मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीच्या विरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी पार पडली असून प्रदीप शर्माची आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना कायमचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशावर आश्चर्य व्यक्त केले आहे. Pradeep Sharma Case
प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या डबल बेंचने याबाबतचे आदेश दिले आहेत. सात दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं निर्दोश मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं.