महाराष्ट्र
Trending

दिल्लीतील सत्ताकारण: पंतप्रधान मोदी-शिंदे भेटीने चर्चेला उधाण!

Eknath Shinde Family Meet Amit Shah : अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह मोदींच्या भेटीला

ANI :- संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू असतानाच, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळासह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदींशी त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. शाह यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी, आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी भेटीमागचे कारण सांगितले. “पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ याबाबत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती,” असे त्यांनी सांगितले. तसेच, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणल्याबद्दलही त्यांनी मोदींचे कौतुक केले.

भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेदांच्या चर्चांवरही शिंदे यांनी उत्तर दिले. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावले. “आम्ही महायुतीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यात कोणतीही धुसफूस नाही,” असे ते म्हणाले. या भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0