Powai Police News : पवईत पोलिसांचा ‘पहाटेचा छापा’! 6 लाखांचे MD ड्रग्ज जप्त; ‘पिकनिक’ जंक्शनवरून परदेशी तस्कर जेरबंद

Powai Police Latest News : मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची उल्लेखनीय कामगिरी; ‘120 ग्रॅम मॅफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल.
मुंबई :- मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेत पवई पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे Powai Police Crime Branch प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पहाटे 2 वाजता छापा टाकून तब्बल सहा लाख रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थासह एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
पिकनिक हॉटेलजवळ आरोपी जाळ्यात
पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, पिकनिक हॉटेल जंक्शन, पवई येथे एका इसमाची संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाली. पहाटे पथकाने सापळा रचून या संशयास्पद इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ 120 ग्रॅम MD (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ आढळला. बाजारात याची किंमत सहा लाख रुपये इतकी आहे. Powai Police Latest Crime News
याप्रकरणी पोलीस पथकातील पोलीस हवालदार अर्जुन राठोड यांनी पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध कलम 8 (क) सह 22 (ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हा आरोपी पवई परिसरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे.
पोलीस पथक

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस सह आयुक्त सत्यनारायण (कावसु) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, परिमंडळ-10 चे पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे आणि साकीनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या थेट देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड आणि राहुल पाटील तसेच पोलीस हवालदार मारोती सुम्नर, लांडगे, खंडागळे आणि पोलीस शिपाई प्रदिप शिरसाट, हनुमंत वारंग यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.


