पुणे

Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर याच्या आईनंतर आता वडिलांवरही कारवाईची केली मागणी

Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडीलांवर कारवाई करण्याची मागणी, पुणे जिल्हा तलाठी संघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे

पुणे :- वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर Pooja Khedkar यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. आजच पूजा खेडकर यांच्या आईला पुणे पोलिसांनी Pune Police जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला दाखविलेल्या बंदुकीबाबत अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर प्रकरण चांगलेच राज्यात गाजत असताना आता आई नंतर वडिलांवर Pooja Khedkar Father ही कारवाईची मागणी पुणे जिल्हा तलाठी संघाकडून Pune District Talathi Group करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

पुणे जिल्हा तलाठी संघाकडून Pune District Talathi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना पत्र लिहिले आहे, त्या पत्रात उल्लेख केला आहे की, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रशिक्षक कालावधीमध्ये असताना अत्यंत उद्दामपणा चे वर्तन केले आहे. तसेच त्यांचे वर्तन हे आयएएस अधिकाऱ्याला न शोभणारे आहे. शासनाकडून प्रशिक्षणार्थी कोणत्याही अधिकाऱ्याला केबिन, गाडी, निवासस्थान‌,स्वातंत्र शिपाई असे कोणत्याही सुविधा नसताना आपल्या पदाचा गैरफायदा घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी परस्पर संपर्क साधून दमदाटी करून जबरदस्तीने या सुविधा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच,त्यांच्या वडिलांनी ही तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी देऊन अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेऊन, पूजा खेडकर यांना दिला. तसेच, त्यांचे वडील हे सातत्याने अधिकाऱ्यांना दमदाटी करत असे,पुजा खेडकर यांच्या याबाबतीत समोर येत असलेल्या बाबी म्हणजेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या आधारे अन्य पात्र उमेदवारांचा हक्क डावलून आयएस अधिकारी पद मिळविले या बाबींचा संघटनेच्या वतीने निषेध करणेत येत आहे.

पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा

तसेच, त्यांच्या वडीलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी व पुजा खेडकर यांनी सुहास दिवे जिल्हाधिकारी पुणे यांच्यावर, महिला असलेचा फायदा घेऊन स्वतःचा छळ केलेबाबतची केलेली खोटी तक्रार याचा संघटनेच्या वतीने निषेध करणेत येत आहे. तसेच, जिल्हाधिकारी यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असून स्वार्थासाठी केलेले आहे. गेले 25 ते 26 वर्षापासून अत्यंत चांगले अधिकारी म्हणून काम पाहत आले आहे हे सर्व आरोप खोटे असून पूजा खेडकर आणि त्यांचे वडील यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करेल असा इशारा संघटनेने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0