मुंबई

Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, ती आता IAS अधिकारी होणार नाही, परीक्षा देण्यावरही बंदी

Pooja Khedkar Case Update UPSC ने Pooja Khedkar CSE-2022 ची उमेदवारी देखील रद्द केली आहे. आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ANI :- वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS पूजा खेडकरवर UPSC ने मोठी कारवाई केली आहे. आता ती आयएएस होणार नाही. UPSC ने पूजा खेडकरला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास किंवा निवड करण्यास मनाई केली आहे. याशिवाय, त्यांची CSE-2022 साठीची उमेदवारीही आयोगाने रद्द केली आहे. आयोगाने एक निवेदन जारी करून या कारवाईची माहिती दिली.

यूपीएससीने सांगितले की, सर्व नोंदी तपासल्यानंतर असे समोर आले की, पूजा खेडकरने CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आयोगाने CSE च्या गेल्या 15 वर्षांच्या डेटाचे पुनरावलोकन केले ज्यामध्ये 15 हजारांहून अधिक उमेदवारांचा समावेश होता.

विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पूजा खेडकरच्या अंतरिम जामिनावर बुधवारी (31 जुलै) दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 1 ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे.

यूपीएससीने पूजा खेडकरला नोटीसही बजावली होती. खेडकर यांनी नाव, वडिलांचे आणि आईचे नाव, छायाचित्र/स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि बदल करून बनावट ओळख निर्माण करून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करण्याच्या संधीचा गैरफायदा घेतल्याचे आयोगाला तपासात आढळून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0