पुणे

Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

  • पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिसांचा गंभीर आरोप

पुणे :- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजाला नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर तिच्या आईने कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे, पुणे शहर पोलिसांनी पूजाची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

‘रोड रेज’ प्रकरणातील फरार आरोपीला पळवून लावण्यात मदत केल्याने कारवाई

हे प्रकरण नवी मुंबईतील ‘रोड रेज’ प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी एका ट्रक चालकाच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडकर यांच्या घरी आणले होते. तपास करत नवी मुंबई पोलीस या ठिकाणी पोहोचले असता, मनोरमा खेडकर यांनी त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखले.

पोलिसांचा आरोप आहे की, मनोरमा खेडकर यांनी फक्त शासकीय कामात अडथळाच आणला नाही, तर आरोपींना पळून जाण्यासही मदत केली. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचे नावही या अपहरण प्रकरणात समोर आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना पकडण्यासाठी आलेले पाहून पूजाच्या आईने त्यांना पळवून लावण्यात मदत केली.

यावेळी, पोलिसांनी घराच्या दारावर नोटीस लावण्याचा प्रयत्न केला असता, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडले. पोलिसांनी लावलेली नोटीसही फाडून टाकण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम 221, 238 आणि 263 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर मागील काही दिवसांपासून अनेक वादामुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप होत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. पोलीस सध्या फरार असलेल्या दिलीप खेडकर यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0