•Mumbai Police Shows Green Flag For i-Bike Forensic Team आय-बाईक फॉरेन्सीक टीमची स्थापना, गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळावरून फॉरेन्सिक दुवे गोळा करण्यासाठी आय-बाईक युनिटची स्थापना
मिरा रोड :- मिरा-भाईंदर वसई-विरार यांनी आय- बाईक युनिटला हिरवा झेंडा दाखवत फॉरेन्सीक टीमची स्थापना करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यांचे घटनास्थळावरून फॉरेन्सीक दुवे (एव्हिडन्स, पुरावे) गोळा करण्यासाठी या टीमचा मुख्य हेतू आहे. सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा असणारे गुन्हे यांच्या घटनास्थळी फॉरेन्सिक आय-बाईक पथक भेट देणे बंधनकारक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नवीन कायदयानुसार घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने कौशल्यपूर्वक भौतिक पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये आय-बाईकची स्थापना करण्यात आली आहे. तसेच गुन्हयाचे घटनास्थळावरील फॉरेन्सीक पध्दतीने दुवे/पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतलेले पोलीस अंमलदारांची नेमणुक करुन आयुक्तालयातील तीन परिमंडळाकरीता प्रत्येकी एक आय-बाईक व फॉरेन्सीक किट देऊन 9 एप्रिल रोजी मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत
पोलीस आयुक्तालय अंतर्गत फॉरेन्सीक आय-बाईक कार्यान्वीत झाल्याने आयुक्तालयात दाखल होणारे गंभीर गुन्हयाचे घटनास्थळावरुन फॉरेन्सीक पुरावे गोळा करुन न्यायालयास शास्त्रोक्त पध्दतीने मांडणी होऊन गुन्हयाचे दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे.
आय-बाईक ही मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयातील प्रत्येक परिमंडळाकरीता नेमण्यात आल्या असून त्यावर दिवस-रात्र प्रशिक्षित अंमलदार नेमण्यात आले आहेत.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…