Police Bharti Update : पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी एक खुशखबर.. एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी परीक्षेसाठी गृहमंत्रालयातून सूचना
• Police Bharti Update एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी परीक्षा असणाऱ्या पोलीस भरती उमेदवारासाठी गृहमंत्रालयाकडून सूचना, अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडून माहिती
मुंबई :- राज्यात पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी 19 जून पासून मैदानी चाचणी परीक्षा ची सुरुवात होणार आहे. अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्य पणाला लावून पोलीस भरतीसाठी उतरत असतात. अशातच पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवार एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणाहून भरती करिता उभे राहतात. अशा भरतीच्या उमेदवारांकरिता पोलिसांकडून एक विशेष सूचना देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी काही विशेष सूचना देण्यात आले आहे. एकाच दिवशी दोन पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत मध्ये गैरसोय होऊ नये याकरिता सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागाकडून सूचना देण्यात आले आहे. Police Bharti Update
पोलीस भरती परीक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना
उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. अशावेळी उमेदवारांची गैरसोय होऊ नये आणि एकाच दिवशी दोन्ही परीक्षा येऊ नये याकरिता महासंचालकाकडून सूचना देण्यात आले आहे.उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. Police Bharti Update
• दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी.
• मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे.
• मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. “पोलिस भरती 2022-23 मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा”असे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे. Police Bharti Update