Police Bharti : पोलीस भरती उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील मैदानात बदल
Police Bharti Latest Update : पावसाच्या कारणामुळे मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरती मैदानी चाचणीतील मैदान बदलण्यात आले
मिरा रोड :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पावसाच्या कारणामुळे ज्या मैदानात पोलीस भरती घेण्याकरिता अडचणी येत असेल किंवा चिखल होत झाला असेल अशी भरती पुढे ढकलावी अन्य इतरत्र स्थलांतर करावे असे निर्देश गृहमंत्री यांनी प्रशासनाला दिले होते. यावरूनच मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानात चिखल झाल्याने ती भरती आता दुसऱ्या ठिकाणी घेणार असल्याचे पोलीस आयुक्त यांनी निर्देश दिले आहे. Police Bharti Latest Update
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी सुभाष चंद्र बोस मैदान भाईंदर या ठिकाणी होणार होती. परंतु पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ही भरती पुढे ढकलण्यात आली असून ती 24 जून रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिका बेवर्ली पार्क मैदान आरक्षण क्रमांक 300 मैदानाच्या बाजूला अरबी के स्कूल रोड मेरे कोल्ड बिल्डिंग समोर मिरा रोड येथे घेण्यात येणार आहे. तरी भरतीसाठी उपस्थित होणाऱ्या उमेदवारांनी मैदान चाचणीकरिता या मैदानात जावे तसेच पोलिसांकडून उमेदवारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जीपीएस आणि हेल्पलाइन नंबर दिला आहे.पोलीस भरती Police Bharti मैदानाचे GPS लोकेशन पुढील प्रमाणे आहेः- Police Bharti Latest Update
(https://maps.app.goo.gl/WEd98pZsD9pv61qX7) याबाबत काही शंका असल्यास हेल्प लाईन नंबर ७०२१९९५३५२/०२२- ३५००६११४ यावर संपर्क साधण्यात यावा.