Police Bharti 2024 : पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी, EWS अंतर्गत अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची भरती तात्पुरती स्थगित
Police Bharti For EWS Martha Candidate : पोलीस भरतीतील मराठा EWS उमेदवारांची निवड प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. पोलीस भरती अंतिम टप्प्यावर
मुंबई :- पोलीस भरतीसाठी Police Bharti अर्ज करणाऱ्या मराठा तरुणांसाठी Martha Candidate महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पोलिस भरतीसाठी Nashik Police Bharati आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातून (EWS) अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची निवड तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
या निर्णयानंतरही अन्य उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. त्यांनी संबंधित विभागांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबत अनिश्चिततेमुळे हे पाऊल उचलल्याची माहिती दिली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणजे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील भरतीसाठी EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांची निवड प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. Police Bharti Important Update
महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, अजूनही अनेक ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण पोलिस दलातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेनंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. Police Bharti Important Update
ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांबाबत संभ्रम आहे. मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे धोरण सरकारने ठरवावे, अशी विनंती अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी केली आहे. या अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी शासन निर्णय होईपर्यंत रद्द न करता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. Police Bharti Important Update