PMC News | पारगे नगर कोंढव्यात अनधिकृत बांधकामांची रेलचेल, मनपाकडून डोळेझाक : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लक्ष देणार का ?
- बिल्डर अल्ताफ शेख यांच्याकडून एकापाठोपाठ अनधिकृत बांधकामाची शृंखला : फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक !
पुणे, दि. ९ मार्च, महाराष्ट्र मिरर टीम : PMC News | Unauthorized constructions in Parge Nagar Kondhwa, turned a blind eye by the municipality: Will the anti-corruption department pay attention?
कोंढव्यात अनधिकृत बांधकामे जोमात असून अल्ताफ शेख या बिल्डरकडून एकापाठोपाठ एक अनधिकृत बिल्डिंगची शृंखला सुरु आहे. या अनधिकृत बांधकामांकडे महापालिका डोळेझाक करत असून आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लक्ष दिल्याशिवाय अनधिकृत बांधकामांचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येणार नाही.
पारगे नगर, पोकळे मळा, स.न. ३८ येथे, मस्जिद शेजारी असलेल्या ‘आयात हाईट्स’ बांधकामावर पुणे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली असताना देखील सदर बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. २-३ गुंठे जागेत बेकायदा ६ मजली इमारत बांधून महापालिका व शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडवणाऱ्या अल्ताफ शेख विरोधात कारवाई होत नसल्याने पालिका अधिकारी व बिल्डर यांचे साटेलोटे झाले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
अनधिकृत बांधकामामुळे कोंढव्यात सार्वजनिक पाणी पुरवठा, मल निःस्सारण, ड्रेनेज, वाहन पार्किंग, वाहतूक यावर ताण निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना अवैध बांधकामामुळे नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
अनधिकृत बांधकामे विक्री करता येत नसताना देखील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक करत बेकायदा पद्धतीने सदनिका विक्री केल्या जात आहेत. ‘महा रेरा’ कडून लवकरच या प्रकरणी मोठी कारवाई हाती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते.
अल्ताफ शेख यांच्या सोबतच निजाम शेख, साजिद शेख, बबलू यांनी बेकायदा बांधकामे जोमात सुरू असून यावर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
मनपा आयुक्त विक्रम कुमार गप्प का ?
कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांना चोरी-छुपे पाठिंबा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही. पारदर्शक प्रशासनासाठी नावाजलेले मनपा आयुक्त विक्रम कुमार कोंढव्याबाबत गप्प का? असा सवाल कोंढवा येथील नागरिक उपस्थित करु लागले आहेत.