Padmakar Valvi : काँग्रेसला मोठा धक्का, या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा आमदार
•काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. आता नेते पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश.
मुंबई :- काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पद्माकर वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातून तीन वेळा आमदार झाले आहेत. ते उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते असून यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा कालच नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली होती. पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. Padmakar Valvi
अशोक चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये आज कॉंग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. वळवींनी 2009 च्या निवडणूकीमध्ये नंदुरबारच्या शाहदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाची, नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वळवी हे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते असल्याने लोकसभेपूर्वी त्यांचा भाजपा मधील पक्षप्रवेश हा कॉंग्रेस साठी मोठा धक्का आहे. Padmakar Valvi