PM Modi At Mumbai Airport : मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चेसाठी मोदींचे आगमन; महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडून आत्मीय स्वागत
मुंबई | भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक संबंधांना नवी दिशा देण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा मुख्य टप्पा असलेल्या मुंबईतील कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्य सरकारच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
विमानतळावर दिग्गजांची उपस्थिती
पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे आत्मीय स्वागत केले.
आजचे महत्त्वाचे कार्यक्रम
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात आज ‘लोकभवन’ (पूर्वीचे राजभवन) येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सायंकाळी दोन्ही नेते ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष -2026’ चे अधिकृत उद्घाटन करतील.
या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, दक्षिण मुंबईत विशेष वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची ही भेट जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…