Prime Minister Narendra Modi visited the Ahmedabad crash site today : पंतप्रधान मोदींनी स्वतः घटनास्थळ आणि रुग्णालयाला दिली भेट; जखमी रमेश कुमार यांची घेतली भेट
ANI | अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेलं एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान काही क्षणातच शोकांतिका बनलं. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या भीषण अपघातात विमानातील 242 पैकी केवळ एकच प्रवासी वाचला आहे. इतर सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अपघातस्थळाची पाहणी केली तसेच अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एकमेव जिवंत बचावलेले प्रवासी रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली. विश्वास कुमार हे ’11ए’ सीटवर बसले होते आणि आपल्या भावासोबत लंडनला जात होते.
गृह मंत्री अमित शहा व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री गुरुवारीच घटनास्थळी पोहोचले होते. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिले–
‘आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद आहे. मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांना आणि अधिकाऱ्यांना भेटलो, जे सतत कठोर परिश्रम करत आहेत. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत.’
ते म्हणाले- या विमान अपघाताने आपण सर्वजण खूप दुःखी आणि स्तब्ध झालो आहोत. इतक्या लोकांच्या अचानक आणि हृदयद्रावक मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. आम्हाला त्यांचे दुःख समजते आणि आम्हाला माहिती आहे की या अपघातामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…