Dombivli Fire News : डोंबिवलीत भीषण अपघात, कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने आग, पाच कामगार जखमी

Dombivli Fire News : डोंबिवलीतील एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
डोंबिवली :– एमआयडीसी MIDC परिसरात असलेल्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट boiler blast in a factory at Dombivl झाल्याने आग लागली. अग्निशमन दलाच्या चारहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. डोंबिवली केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. सुमारे 5 कामगार नुकतेच जखमी झाले आहेत. काही वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या छोटे छोटे स्फोट होत आहेत. किती नुकसान झाले याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट
मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीनंतर काळ्याकुट्ट धुराचे लोट दूरवरुनही पाहायला मिळत होते. डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये काही अंतराने लहान मोठे स्फोट काही काळानंतरही सुरुच राहिल्यामुळे या घटनेची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. boiler blast in a factory at Dombivl
Web Title : Dombivli Fire News : Horrific accident in Dombivli, boiler explosion caused fire in factory, five workers injured