Heavy Rains Force Cancellation PM Modi’s Pune Visit and Metro Launch : अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विमान उड्डाणांची मार्ग बदलल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे
मुंबई :- मुंबईसह राज्यात मुसळधार Heavy Rain In Maharashtra पावसाची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे मुंबई सह अनेक जिल्ह्यात पावसाचे पाणी साचले होते. तसेच, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक व विमान उड्डाणांवर झालेला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi Pune Visit यांचा पुण्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. तसेच आजही पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आज पुण्यात मेट्रोसह 22 हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6.30 वा. त्यांची सभा होईल. मात्र आता या सभेवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मोदींची आजची सभा होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या वतीने त्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुण्यातील पावसाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा स पा महाविद्यालय मैदान येथून हलवून स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यासाठी पर्यायी तयारी होती. परंतु पावसाची शक्यता वर्तवल्याने आता हा दौरा रद्द झाला आहे.