PM Modi Makar Sankranthi Wishes Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “मकर संक्रांतीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्याला समर्पित हा शुभ सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो.
ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “मकर संक्रांतीच्या PM Makar Sankranthi Tweet सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्याला समर्पित हा शुभ सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मकर संक्रांत हा भारतीय संस्कृती आणि परंपरेवरील अढळ श्रद्धेचा सण आहे. ऊर्जा, उत्साह आणि प्रगतीच्या या पावन सणानिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मकर संक्रांतीच्या शुभ सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आनंदाचा हा शुभ सण प्रत्येकाच्या जीवनात चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि राज्यातील नागरिकांना नव महाराष्ट्राच्या संक्रमण साठी शुभेच्छा देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की,नव महाराष्ट्राकडे संक्रमण करूया, विकासाची कास धरुया!
मकरसंक्रमणाच्या मंगलमय शुभेच्छा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यातील जनतेला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे.उत्तरायणातील सूर्य आपल्या सर्वांच्या स्वप्नांना एक नवी उर्जा प्रदान करो, आपले यश आणि किर्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो, आपले आप्तेष्ट आणि कुटुंबीय सुदृढ, दीर्घायु होवोत हीच प्रार्थना…
मकर संक्रांती, पोंगल, बीहू, लोहरीच्या प्रसंगी आपणास सुख, समाधान, ऐश्वर्य, समृद्धी लाभो या शुभेच्छा…
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला..; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तमाम जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
समाजा-समाजात आपुलकीची, बंधूभावाची, आत्मीयतेची भावना वृद्धिंगत होवो. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, यश, ऐश्वर्य, शांती नांदो हीच सदिच्छा..!