Chhatrapati Sambhajinagar Bribe News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन शिपायांना लाच स्वीकारताना अटक

•डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन शिपायांना 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर पथकाने अटक केली आहे
छत्रपती संभाजीनगर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शिपायांना 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील सफाई कामगार म्हणून निवृत्त महिलेला सातवा वेतन आयोगाप्रमाणे थकीत रक्कम मिळून देण्यासाठी शिपायाने त्यांच्या मुलाकडे 18 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी रूपचंद बाबूलाल मुंगसे (54 वय शिपाई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि दीपक नंदकिशोर रॉय (59 वय शिपाई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांना एसीबीने बेड्या ठोकल्या आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,24 एप्रि रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, तक्रारदार यांचे आई या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधून सफाई कामगार या पदावरून सेवानिवृत्त झालेने त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची 3 लाख 63 हजार 619 रुपये रक्कम अलोसे यांनी सह संचालक, शिक्षण विभाग कार्यालय, उस्मानपुरा, छत्रपती संभाजी नगर या कार्यालयातून मिळवून देण्याचे सांगितले. शिपाई मुंगसे आणि रॉय यांनी 18 हजार रुपये लाच मागणी करत आहेत. याप्रकरणी तक्रारदार यांनी एसीबीला तक्रार दिली होती.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची तक्रारदार व पंच यांना आरोपी यांचे कडे पाठवून पडताळणी केली असता आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 18 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तात्काळ स्वीकारण्याचे मान्य केले, एसीबीने सापळा रॉय यांनी तक्रारदार यांचेकडून पंच समक्ष 18 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली, असता त्यांना ताब्यात घेतले आहे.बेगमपुरा पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर ,सुरेश नाईकनवरे, पो. उप अधिक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर सापळा पथक पोलीस अंमलदार युवराज हिवाळे ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत लाचखोर शिपायांना अटक केली आहे.



