PM Modi Diwali Celebrations : ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक असलेल्या ‘INS विक्रांत’ला भेट; नौसैनिकांना मिठाई भरवून दिल्या शुभेच्छा
ANI :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी भारतीय नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली आहे. गोव्यातील आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या स्वदेशी विमानवाहू नौकेवर (Aircraft Carrier) त्यांनी नौसैनिकांशी संवाद साधत त्यांची दिवाळी गोड केली.
स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आयएनएस विक्रांतला भेट देऊन जवानांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ चा आयएनएस विक्रांत हे सर्वात मोठे प्रतीक आहे. स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत भारताच्या वाढलेल्या सैन्य क्षमतेचे प्रतिबिंब आहे.
जवानांशी भावनिक संवाद
मोदींनी यावेळी सर्व नौसैनिकांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “तुमच्या माध्यमातून मी माझ्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नौसैनिकांनी देशभक्तिपर गाणी गाऊन उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतच्या कामगिरीचा उल्लेख करत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी नौसैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…