PM Modi : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पीएम मोदींनी संविधानाच्या प्रतीला नमन केले आणि कपाळावर लावले.
PM Modi : केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा संविधानासमोर नतमस्तक होऊन सर्वांची मने जिंकली आहेत. शुक्रवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सेंट्रल हॉलमध्ये संविधान उचलले आणि कपाळावर लावले.
ANI :- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली NDA पुन्हा एकदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. त्याआधी शुक्रवारी दिल्लीत एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पुन्हा एकदा पीएम मोदींची खास शैली पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदींनी PM Modi येथे संविधानासमोर नतमस्तक झाल्यावर सर्व सहकारी खासदार त्यांच्याकडे पाहतच राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानापुढे नतमस्तक तर झालेच पण ते उचलून कपाळावर लावले. त्यानंतर सभागृहात उपस्थित सर्व एनडीए खासदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. PM Modi Latest Update
यापूर्वी 20 जून 2014 रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर वाकून नमस्कार केला होता. त्यावेळीही त्यांचे खूप कौतुक झाले होते. आता त्यांनी राज्यघटना कपाळाला लावली आहे. पंतप्रधान मोदी PM Modi यांनी नेहमीच संसद आणि संविधानाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्षांनी अनेकवेळा त्यांच्यावर संविधान बदलल्याचा आरोप केला असला तरी प्रत्येक वेळी त्यांनी संविधानाच्या रक्षणाचा पुनरुच्चार केला. संसदेत संविधानाच्या प्रतीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीवरचा आपला विश्वास व्यक्त केला आहे. PM Modi Latest Update
Web Title : PM Modi: In the Central Hall of the Parliament, PM Modi bowed to the copy of the Constitution and placed it on his forehead.