Ulhasnagar Sex Racket Raid : उल्हासनगरमधील लॉजवर छापा, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!

Thane Crime Branch Raid :लॉज चालकास अटक, दोन पीडित महिलांची सुटका ; गुन्हे शाखेची कारवाई
उल्हासनगर :- उल्हासनगर कॅम्प नंबर-4 येथील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून लॉज चालकाला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. Ulhasnagar Latest Crime News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गोरडे यांना 8 ऑगस्ट रोजी याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. उल्हासनगरमधील सूर्य लॉजमध्ये लॉज चालक दोन असहाय्य महिलांना वेश्यागमनासाठी बोलवणार असल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.
पोलीस पथकाने सापळा रचून लॉजवर छापा टाकला आणि लॉज चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, पोलीस हवालदार व्ही. आर. पाटील, आर. यु. सुवारे, व्ही. जी. नाईक, के. बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी. जी. खरात, एच. आर. थोरात, के. एम. चांदेकर आणि पोलीस शिपाई एस. सी. पाटील यांचा सहभाग होता.


