मुंबईठाणे
Trending

Maharashtra Political Update : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये राजीनामास्त्र!

Chandrapur political Updates : नाना पटोले आणि नाराज भाजप नेते आबित सिद्दिकींच्या भेटीने राजकीय भूकंप होण्याची चर्चा; चंद्रपुरात मुनगंटीवारांविरुद्ध काँग्रेसचा हल्लाबोल!

चंद्रपूर :- नगरपालिका निवडणुका घोषित होताच भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या मोठ्या रस्सीखेचीमुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. अनेक भाजप पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनी डावलल्याने नाराज झालेल्यांनी राजीनामाअस्त्र उगारले आहे. निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचलेली असतानाच, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सदस्य आणि मुस्लिम समाजाचे नेते आबित सिद्दिकी यांच्या घरी भेट घेतल्याने मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पटोले यांनी सिद्दिकींच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी, भाजपमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपच्या राजीनामा सत्रामुळे सिद्दिकींसारखे नेते काँग्रेसच्या गळाला लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

चंद्रपुरात मुनगंटीवार वि. काँग्रेस थेट वाद
दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुनगंटीवारांचे वादग्रस्त वक्तव्य: मुनगंटीवार यांनी नुकत्याच एका प्रचारसभेत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. “ज्या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल, त्या वॉर्डात बोर्ड लावणार आणि त्या ठिकाणच्या नागरिकांनी काँग्रेसकडूनच विकास मागावा,” असे त्यांनी म्हटले होते.

काँग्रेसचा पलटवार: मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी जोरदार पलटवार केला आहे. “मुनगंटीवार यांनी जनतेला धमकावले यातच आमचा विजय आहे,” असे समर्थ यांनी ठणकावून सांगितले आहे.

भाजपचा विश्वास: या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांनी मात्र मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळेच मूल शहराचा विकास झाल्याचे सांगत जनता भाजपलाच निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दिवसांत काँग्रेस विरुद्ध भाजप अशा आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मूल नगरपरिषदेची ही लढत लक्षवेधी ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0