विधिमंडळ अधिवेशनाच्या सांगतादिवशी फोटो सेशन!
•विधिमंडळातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष मंत्री आमदार सर्वच एकाच फ्रेममध्ये
नागपूर :- राज्य विधिमंडळाचा अंतिम आठवडा असून आज विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सांगता पूर्वी राज्य विधिमंडळाच्या सर्व सदस्यांचा फोटोसेशन नागपूरच्या विधानभवनाच्या पटांगणात संपन्न झाला आहे.
हिवाळी पावसाळी आणि आर्थिक अधिवेशन संपन्न झाल्यानंतर अंतिम आठवड्याच्या पूर्वी विधिमंडळाच्या संपूर्ण सदस्यांसोबत फोटो सेशन करण्याची पारंपारिक पद्धत आहे. आज (शनिवारी दि.21 डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे,उपसभापती नीलम गोऱ्हे,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांचा फोटोसेशन कार्यक्रम विधिमंडळाच्या पटांगणात संपन्न झाले आहे. यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांनी आणि महाविकास आघाडीच्या बरेच आमदारांनी या कार्यक्रमाला दांडी मारलेली पाहायला मिळत आहे.
फोटो गॅलरी