Phase 2 Loksabha Election Update : राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, आकडेवारीत ही जागा पहिल्या क्रमांकावर आहे
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अमरावती, अकोला, नांदेड अशा एकूण आठ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे.
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धा येथे 56.66 टक्के, अकोल्यात 52.49 टक्के, अमरावती मतदारसंघात 54.50 टक्के, बुलढाण्यात 52.24 टक्के, हिंगोलीमध्ये 54.03 टक्के, नांदेडमध्ये 52.47 टक्के, परभणीमध्ये 53.79 टक्के आणि यवतमाळमध्ये 54 टक्के मतदान झाले आहे. Phase 2 Loksabha Election Update
आज 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात (टप्पा 2) आज एकूण आठ जागांसाठी मतदान होत आहे. आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी मतदारसंघात लोक मतदान करत आहेत. Phase 2 Loksabha Election Update
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51% टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान वर्धा लोकसभेत झाले, तर सर्वात कमी मतदानाची नोंद हिंगोली लोकसभा मतदार संघात झाली आहे. Phase 2 Loksabha Election Update
मतदारसंघनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
वर्धा – 56.66 टक्के
अकोला – 52.49 टक्के
अमरावती – 54.50 टक्के
बुलढाणा – 52.24 टक्के
हिंगोली – 52.03 टक्के
नांदेड – 52.47 टक्के
परभणी -53.79 टक्के
यवतमाळ – वाशिम – 54.04 टक्के