Ulhasnagar Police Solved Kidnapping Mystery : पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतल्या असून त्यांना बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, पाच वर्षीय बालकाची सुखरूप सुटका
उल्हासनगर :- उल्हासनगर पोलिसांनी Ulhasnagar Police मोठे कामगिरी केली आहे.बोरिवली येथून अपहरण झालेल्या 5 वर्षीय मुलाची उल्हासनगर पोलिसांनी शहाड फाटक उड्डाण पुल परिसरातून बुधवारी रात्री सुटका केली. तसेच अटक केलेल्या दोन अपहरणकर्ते आरोपीसह मुलाला बोरिवली रेल्वे पोलीसांच्या Borivali Railway Police Station ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांना बोरीवली येथून अपहरण झालेला 5 वर्षाचा मुलगा व अपहरणकर्ते शहाड रेल्वे फाटक उड्डाणपूल परिसरात असल्याची माहिती बुधवारी मिळाली. ताम्हणे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजित भालके व बिट मार्शल पोलीस पी डी रुपवते व राम पाटील यांनी शोध घेतला असता, 5 वर्षाच्या मुलाला घेऊन दोन व्यक्ती संशयितरीत्या उभे दिसले. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन बोलते केल्यावर, खरा प्रकार उघड झाला. बोरिवली येथे राहणारे कृष्णा गुप्ता यांच्या 5 वर्षीय मुलांचे मंगळवारी गोरेगाव रेल्वे स्थानकातून अपहरण झाले होते. या प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासात संबंधित अपहरण झालेले बालक शहाड रेल्वे स्थानकाजावळ असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.अपहरण करणारे हे मुलाच्या वडिलांचे मित्र असल्याचे उघड झाले असून पैशासाठी अपहरण केल्याचे बोलले जाते.
अपहरण झालेल्या मुलासह अपहरणकर्ते करणकुमार रामथिरण कनोजीया व धरमपाल रामकिशोर यादव यांना अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी बोरिवली रेल्वे पोलिसा सोबत संपर्क करून, अपहरण झालेले बालक व अपहरणकर्ते यांना अटक केल्याची माहिती देऊन बोलावून घेतले. बुधवारी रात्री उशिरा अपहरण झालेल्या मुलासह अपहरणकर्ते यांना बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…