महाराष्ट्र

Pen Crime News : ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ‘लाच लुचपत’ची धडक कारवाई

•ACB Action Mode On परमेश्वर साईराम जाधव (48 वय) या ग्रामविकास अधिकारी यांचे नाव असून ग्रामपंचायत मळेघर, पेण येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत आहे

पेण :- कोर्टात घराचे असेसमेंट कागदपत्र दाखल करण्याकरिता आवश्यक कागदपत्रात करिता ग्राम विकास अधिकारी यांनी तक्रारदार वकील यांच्या आशिल कडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, पेण यांनी कारवाई करत ग्राम पंचायत अधिकारी परमेश्वर सवाईराम जाधव (48 वय) यांना ताब्यात घेतले आहे. जाधव हे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे वकिल असून त्यांचे आशिल यांना कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एम एस इ. बी. येथे सादर करण्यासाठी त्यांचे वडगाव तालुका पेण, जिल्हा रायगड येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्याने तो मिळण्याकरिता तक्रारदार यांचे अशील यांनी जाधव ग्रामपंचायत अधिकारी‌ मळेघर ,पेन ,जिल्हा रायगड यांचे कडे दिनांक 17 मार्च रोजी अर्ज केला होता. परंतु तक्रारदार यांचे अशील हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी असेसमेंट कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांचे नावे 10 एप्रिल रोजी कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते.

त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी जाधव यांना दिनांक 10 एप्रिल रोजी फोनवरून संपर्क करून नमूद कामाबाबत विचारणा केली असता जाधव यांनी सदर कामाकरिता तक्रारदार यांचे कडे रुपये पाच हजार रकमेची मागणी केली. तक्रारदार याना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी नवी मुंबई,ला.प्र.विभाग येथे येऊन तक्रार दिली.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरून 11 एप्रिल रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर सवाईराम जाधव यांनी रुपये पाच हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

सापळा रचून ग्रामपंचायत अधिकारी यांनी पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारित 2018) कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही पेण पोलिस ठाणे, पेण, जिल्हा रायगड येथे सुरू आहे.

हि कारवाई शिवराज पाटील पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र,सुहास शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र,नितीन दळवी ,पोलीस उपअधीक्षक नवी मुंबई ला. प्र. विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती जयेश येळवे, ला.प्र. वि. नवी मुंबई. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, महिला पोलीस नाईक बासरे , पोलीस शिपाई चौलकर यांनी कारवाई केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0