Pen ACB Trap News : मंडळ अधिकाऱ्याच्या नावानेही मागितले पैसे; लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबागची धडाकेबाज कारवाई
पेण/अलिबाग | जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावांची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पेण तालुक्यातील कांदळे सजाचे तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) महादेव सिताराम धुमाळ (वय 34) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. Pen-Alibhaug Latest Bribe News
नेमकी घटना काय?
तक्रारदार यांची मौजे कांदळे येथे सर्व्हे नं. 89 ही जमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस म्हणून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी तलाठी महादेव धुमाळ यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 22 डिसेंबर 2025 रोजी एसीबी अलिबाग यांच्याकडे तक्रार केली होती. Pen ACB Latest Bribe Case News
तपासणीत लाच मागणी निष्पन्न
एसीबीने तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 22 डिसेंबर रोजी पडताळणी केली. यावेळी आरोपी लोकसेवक महादेव धुमाळ यांनी स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे मोबाईल कॉलवरील संभाषण आणि प्रत्यक्ष भेटीत पंचांसमोर स्पष्ट झाले. या लाचेच्या मागणीला दुजोरा मिळाल्यानंतर एसीबीने कायदेशीर बाबी पूर्ण करून 8 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या दरम्यान पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…