क्राईम न्यूजमुंबई
Trending

Pelhar Police Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त चोरीला गेलेले 8.25 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत; पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Pelhar Police On Republic Day : पेल्हार पोलिसांनी हरवलेले तसेच गहाळ झालेले तब्बल 8 लाख 25 हजार रूपयांचे 55 मोबाईल मुळ मालकाला परत केले आहेत.

नालासोपारा :- 26 जानेवारी प्रजासत्ताक Republic Day दिनानिमित्त पोलिसांच्या कामगिरीमुळे तब्बल 55 गहाळ आणि चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकाला मिळून द्यायला पोलिसांना यश आले आहे.जयवंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 विरार, बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त, पेल्हार पोलीस ठाण्याचे Nalasopra Pelhar Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील हे मोबाईल होते.पोलीस ठाण्यांत ‘तीन महिन्याची विशेष’ मोहिम राबवण्याबाबत सचूना दिल्या होत्या.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार केले होते. या पथकाकने जे मोबाईल मिळून येत नाहीत, अशा मोबाईल फोनच्या आय.एम.ई.आय क्रमांकावरुन संबंधित मोबाईल कंपनीला पत्रव्यवहार केला.तांत्रिक विश्लेषणाद्वारे मागील तीन महिन्यामध्ये 55 मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.मिळवलेले सर्व मोबाईल फोन हे यातील मुळ तक्रारदार यांना परत करण्यासाठी हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच प्रकरणात तक्रारदारांना एकदा चोरलेले किंवा हरवलेला मोबाईल परत मिळत नाही, असाच अनुभव असतो. पण, पुणे पोलिसांच्या या प्रयत्नामुळे तक्रारदारांना पुन्हा त्यांचा मोबाईल मिळाला आहे. यावेळी तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळला होता.

पोलीस पथक

जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,डी.एन. चौधरी पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकिल शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपले, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, वसीम शेख, पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख, नेम, पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ-03, मि.भा.प.वि पोलीस आयुक्तालय यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0