PCPC Crime News | खळबळजनक : एमडीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग ! तपास सुरु
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ
पुणे/पिंपरी, दि. २ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) PCPC Crime News | Shocking: Police sub-inspector involved in MD’s crime! Investigation started
मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी परराज्यातील व्यक्तीला अटक केली होती. आरोपीकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले होते. याच गुन्ह्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग तपासला जात असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -१ येथील पोलीस ठाण्यात सदर पोलीस उपनिरीक्षक कार्यरत असल्याचे समजते.
विलास शेळके, पोलीस उपनिरीक्षक, सध्या नेमणूक निगडी पोलीस ठाणे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
शुक्रवारी (दि.1) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रक्षक चौकाच्या पुढे असलेल्या डी.पी. रोड पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी बिहार मधील व्यक्तीवर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून आरोपी उपनिरीक्षकाचे नाव घेण्यासाठी अधिकारी धजावत असल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षक शिंगारे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन स्वीकारला जात नव्हता.
मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ विक्री प्रकरणी नमामी शंकर झा (वय-32 रा. सेक्टर नं. 27 भेळ चौक, निगडी, मुळ रा. मेहनात पैवती, ता. महीनाम जि. दरभंगा बिहार) असे अटक केलल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विजय अशोक मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.