पुणे
Trending

PCMC : महापालिकेत महायुतीची गणिते बिघडली? अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने!

PCMC Political News : ‘मंत्री’ माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी सावध; जागावाटपाचा अंतिम निर्णय 24 डिसेंबरपर्यंत शक्य

मुंबई | राज्यात 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या शिवसेनेत अनेक ठिकाणी समझोता झाला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) मात्र महायुतीमधील ‘जागावाटप’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आणि शिंदे गटाशी जुळवून घेणे कठीण जात असल्याने, राष्ट्रवादीने आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईसह अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.

अजित पवार आणि फडणवीस यांची खलबते

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा जवळपास एक तास महत्त्वाची बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणे शक्य आहे तिथेच युती करावी आणि जिथे संघर्ष अटळ आहे, तिथे पक्षाची ताकद टिकवण्यासाठी स्वतंत्र लढावे, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे.
या महापालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड: भाजपने पुण्यात यापूर्वीच स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवल्याने अजित पवार यांनीही कंबर कसली आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेतही नवाब मलिक आणि इतर जागांच्या मुद्द्यावरून महायुतीत पेच असल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे.

अमरावती आणि नाशिक: या ठिकाणीही राष्ट्रवादी आपली स्वतंत्र ताकद आजमावण्याची शक्यता आहे.
कोकाटेंचा राजीनामा आणि राजकीय परिणाम
नुकतेच सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘मंत्री’ गमावल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू नये, यासाठी राष्ट्रवादीने आता अधिक सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेसोबत ताणले न जाता आपली ‘स्पेस’ निर्माण करण्याचा प्रयत्न अजितदादा करत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

सर्वात मोठी खळबळजनक माहिती म्हणजे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपला रोखण्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीमध्ये जागा मिळत नसल्यास ‘शरद पवार गटासोबत’ तांत्रिक आघाडी किंवा गुप्त युती करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0