MLA Gopichand Padalkar Exposes Milk Adulteration : भेसळयुक्त दुधावर विधानभवनात थेट प्रात्यक्षिक; गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल

•Maharashtra Assembly BJP MLA Gopichand Padalkar Exposes Milk Adulteration “शेतकरी दराला वंचित, ग्राहक विषारी दूध पितोय”; दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची आमदारांची मागणी
मुंबई | महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दुधामध्ये होणाऱ्या भेसळीचा थेट विधानभवन परिसरात प्रात्यक्षिक करून पर्दाफाश केला. एक मिक्सर, दूध, पाण्याच्या बाटल्या, चुना आणि काही रसायने घेऊन आलेल्या या दोन्ही आमदारांनी दूधात दोन प्रकारे कशी भेसळ केली जाते, याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
“मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये भेसळीचे दूध मोठ्या प्रमाणावर विकले जाते. हे दूध लहान मुलांपासून ते आजारी माणसांपर्यंत अनेकांच्या आरोग्यास गंभीर इजा पोहोचवत आहे,” असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. कॅन्सर आणि अनेक रोगांचे मूळ कारण हेच भेसळीचे दूध असल्याचे सांगत, त्यांनी सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फसवणूक – दूध माफियांना जन्मठेपेची शिक्षा हवी
राज्यात दररोज 80-90 लाख लीटर म्हशीचे दूध आणि 1.25 कोटी लीटर गायीचे दूध तयार होते. त्यातील सुमारे 70 लाख लीटर दूध पॅकिंग करून विकले जाते. उर्वरित दूध विविध उपयोगांसाठी वापरले जाते. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळीचे दूध स्वस्त दरात बाजारात येत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.
“या दुधावर कमिशन घेणारे दलाल, व्यापारी ग्राहक आणि शेतकरी दोघांचाही विश्वासघात करत आहेत. अशा दूध माफियांवर जन्मठेपेपर्यंत शिक्षा व्हायला हवी,” अशी ठाम भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतली.
“आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. आमच्या अंगात दूध आहे, विष नाही! आम्ही दूध शुद्ध ठेवतो. पण माफियांचं दूध शरीर नासवणारं आहे,” असा संतप्त सूर दोन्ही आमदारांनी व्यक्त केला.
आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. आमच्या अंगात दूध आहे, विष नाही! आम्ही दूध शुद्ध ठेवतो. पण माफियांचं दूध शरीर नासवणारं आहे,” असा संतप्त सूर दोन्ही आमदारांनी व्यक्त केला.
तसेच, फूड ट्रक तपासणाऱ्या यंत्रणांची संख्या वाढवणे, दूध तपासणीला सशक्त यंत्रणा उभारणे, आणि दूधात भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे, ही आमदारांची सरकारकडे मुख्य मागणी होती.


