धाराशिव

पत्रकार आपल्या लेखणीतून लोकशाही बळकट करण्यासाठी व समाजाचे प्रश्न मांडण्याचे कार्य करतात गटविकास अधिकारी सोपान अकेले

कळंब/धाराशिव (प्रतिनिधी): पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून राष्ट्र ,समाज व लोकशाही बळकट करण्यासाठी साठी कार्य करत असतात, त्यांचे योगदान मोठे आहे. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्या पर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य मिळते असे विचार कळंब पंचायत समिती गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी कळंब पंचायत समिती कार्यालय येथे ६ जानेवारी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केले याप्रसंगी उपस्थित पत्रकारांचा डायरी व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला कार्यक्रमासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे, विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे, दत्तात्रय साळुंखे, आरोग्य विभाग अधिकारी बाबुराव जाधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात. संपादक लक्ष्मण शिंदे यांनी ग्रामीण भागातील पत्रकार सामाजिक बांधिलकीतुन लेखन करतातात बातमीमुळे अनेक वंचित घटकांना न्याय मिळतो असे सांगितले तर ज्येष्ठ पत्रकार बालाजी अडसूळ यांनी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याचे काम करीत असताना कामातील उनिवा दाखविण्याचे काम देखील पत्रकार करतात काही प्रसंगी त्यांना यामुळे विरोध स्वीकारावा लागतो असे सांगितले तर ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याविषयी व दर्पण नियतकालिका विषयी विचार व्यक्त केले व हनुमंत पाटोळे यांनी पत्रकार क्षेत्रातील समस्या मांडल्या प्रसंगी गौर येथील पंचायत समिती माजी सदस्य माने बाप्पा (गौर )सहाय्यक गट विस्तार अधिकारी मनीषा सुकाळे यांनी विचार व्यक्त केले आभार हनुमंत झांबरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमात व्हाईस ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश शिक्षण विभाग प्रमुख चेतन कात्रे, बालाजी बाप्पा आडसूळ, लक्ष्मण शिंदे, समीर मुल्ला, माधवसिंग राजपूत, रामरतन कांबळे, रसूल तांबोळी,हनुमंत पाटोळे, बाबुराव पौळ, प्रवीण कसबे यांची उपस्थिती होती.

Deepak

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago