- अपक्ष उमेदवार अश्फाक मोमीन यांची प्रचारात मुसंडी !
पुणे, दि. १४ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर : Parvati Vidhansabha
Parvati Vidhansabha | लोकशाहीचा महामेळा अर्थातच निवडणूक… जनतेने जनतेसाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रथा… महाराष्ट्रात २०२४ विधानसभेच्या निवडणूका रंगात आल्या आहेत. महायुती आणि आघाडी कडून जोरदार रस्सीखेच होत असताना ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार प्रचारात मुसंडी घेत जोरदार आव्हान निर्माण करत आहेत.
पुणे शहरातील २१२ पर्वती मतदारसंघात असाच काहीसा अनुभव येत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांच्या कडून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ पुन्हा एकदा मैदानात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच माधुरी मिसाळ-अश्विनी कदम यांच्यातील तुल्यबळ लढत अपेक्षित असताना अपक्ष उमेदवार अश्फाक मोमीन यांनी प्रचारात मुसंडी घेत धाकधूक वाढवली आहे.
दैनंदिन कोपरा सभा, डोर-टू-डोर प्रचार आणि दांडगा जनसंपर्क यामुळे प्रचारात अपक्ष उमेदवार यांनी मुसंडी मारली आहे. संदेश नगर येथे घरो घरी जाऊन प्रचार करण्यात आला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते राम भाऊ गायकवाड, संजय पोटभर, सुरेश चांदणे उपस्थित होते. इंदिरा नगर गुलटेकडी येथील दिग्विजय मित्र मंडळ तसेच एकता मित्र मंडळ येथे भेट दिली महिलांचे म्हणणे ऐकून घेतले असता आमच्या वस्तीतला मुलगा म्हणून मला दोन्ही मंडळानी व महिलांनी अश्फाक मोमीन यांना जाहिर पाठिंबा दिला.
तसेच जमाते महेदवीया पुणे शहर यांनी अश्फाक मोमीन यांना पाठींबा दिला आहे. यावेळी लाल साहेब पितळे, निसार भाई हावरे, इब्राहिम भाई हन्नूरे, बबलू भाई जिडगे, चांद मंद्रूपकर, हयात भाई हन्नूरे, अय्युब भाई लुकडे, महेबुब भाई लांडगे उपस्थित होते.