पुणे : विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे नऊ दिवस राहिले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पर्वती parvati मतदारसंघातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, येथे ‘भावी आमदार’ कोण होणार? यावर तर्क- वितर्क सुरू आहेत. यात सध्या तरी महाआघाडी, महायुतीच्या बरोबरीने सर्वसामान्यातील समाजभिमुख अपक्ष उमेदवार अशपाक मोमीन यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अश्विनी कदम यांना तिकीट देण्यात आलं आहे; तर भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम समाज आणि सर्वसामान्यांचा समाजभिमुख उमेदवार म्हणून अपक्ष उभा राहत अश्फाक मोमीन यांनी प्रचारातही आघाडी घेतल्याने पर्वती मतदारसंघात दोघांत ‘तिसरा’ लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. याची नोंद घेऊन पावलं टाकले तर चित्र बदलू शकते, असे वाटते.
प्रचार कोण करणार?
विद्यमान आमदार यांना तिकीट मिळविताना पक्षातून विरोध होता. मात्र, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील माजी नगरसेवक व पदाधिकारी आतून किती काम करतील याबाबत शंका आहे. विरोधी गटाने उमेदवाराविरुद्ध अपप्रचार सुरू केला असून, बिल्डर लॉबी देखील त्यांच्याविरोधात काम करताना दिसत आहे, असे या मतदारसंघात बोलले जात आहे.
तूर्त तिसऱ्या पर्यायाकडे कल असल्याचेच चित्र :
पर्वती मतदारसंघातील काही मतदार हे नाराज असल्याने तिसरा पर्याय म्हणून अपक्ष उमेदवार अशपाक मोमीन यांचा विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघातील तिरंगी लढतीत जनता गुलाल उधळण्याची संधी कोणाला देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विजयाचा झेंडा मिरवणार किंवा ‘बॅट’ ने विकेट घेणार!
मुस्लिम समाज आणि समाजभिमुख अपक्ष उमेदवार अशपाक मोमीन नवखे असले तरी, तरुण आहेत. त्यांचे सर्वसामान्यांपासून उच्च पातळीवर घरोब्याचे आणि सलोख्याचे संबंध आहेत. तळागाळातील नागरिकांशी त्यांची जोडलेली नाळ आणि अडीअडचणीला धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस अशी प्रतिमा पुण्यातील अनेक भागात असल्याने दोन तुल्यबळ उमेदवारासमोर तिसरे मोठे आव्हान उभे करण्यात अपक्ष उमेदवार म्हणून यश आले आहे. त्यामुळे अशपाक मोमीन विजयाचा पताका मिरवणार की त्यांच्यामुळे एखाद्या उमेदवाराची आपल्या ‘बॅट’ चिन्हाने कोणाची विकेट घेणार ? हे लवकरच समजेल.