•अजित पवारांचा 24 तासांत राजीनामा घ्या, अन्यथा अमित शहांची भेट घेणार; अंजली दमानियांचा थेट इशारा
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने महाराष्ट्रात मोठा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ‘महाराष्ट्राची संस्कृती नीट होणं गरजेचं आहे’ असं म्हणत, दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची 24 तासांत मागणी केली आहे. राजीनामा न झाल्यास त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नेमका घोटाळा काय?
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले. हा घोटाळा सरकारी जमिनीच्या विक्री आणि स्टॅम्प ड्युटीच्या वेव्हरशी संबंधित आहे.
जमिनीची लूट: “लोकांच्या जमिनींची, गायरान जमिनींची लूट थांबली पाहिजे. शेतकऱ्यांची लूट चालली आहे.”
500 रुपयांत व्यवहार: 40 एकर सरकारी जमिनीच्या व्यवहारात अमेडिया कंपनीने केवळ 500 रुपयांचा व्यवहार केला.
डेटा सेंटरचा दावा: LY अमेडिया कंपनीने डेटा सेंटर सुरू करायचे आहे, जमीन विकत घ्यायची नाही, असे सांगितले. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले की, “आम्ही डेटा सेंटर सुरू करतो आहे, यात आम्ही डेटा मायनिंग करणार आहे. आमची गुंतवणूक 98 लाखांची होणार आहे, त्यासाठी एलवाय (LY) द्या.”
फ्रॉडचा आरोप: दमानिया यांच्या मते, अमेडिया कंपनीने फक्त फ्रॉड आणि फ्रॉड केला आहे. प्रचंड प्रमाणात स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती, ती फक्त 500 रुपये भरली गेली आहे. जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी वेव्हर मागितलेच गेले नव्हते, डेटा सेंटरसाठी मागितले होते.
जमिनीचा ताबा वकील तृप्ता ठाकूर यांनी केल्याचा आणि हा एक प्रचंड मोठा फ्रॉड असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
अजित पवारांना थेट सवाल
दमानिया यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले:
कलेक्टर गप्प का?: “16 जूनला कलेक्टरला तातडीने हस्तक्षेप करण्याची सूचना देऊनही जून महिन्यापासून कलेक्टर गप्प का बसले?”
पालकमंत्र्यांना माहिती दिली नाही का?: “कलेक्टरांनी 14 जुलैला तहसीलदारांनी 40 एकर जमिनीची विक्री झाल्याचं कळवलं होतं. तरीही कलेक्टर यांनी ही माहिती पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही?” असा थेट सवाल दमानिया यांनी केला.
दमानिया यांच्या तीन प्रमुख मागण्या
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
1.राजीनामा: देवेंद्र फडणवीस यांनी 24 तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्यावा.
2.एसआयटी बरखास्त: सध्याची एसआयटी (SIT) तातडीने बरखास्त करून नवी एसआयटी स्थापन करावी (सहापैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी असल्याने).
3.अंतिम इशारा: दहा दिवसांच्या आत एसआयटीने अहवाल सादर करावा. अजित पवारांचा राजीनामा झाला नाही, तर दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…