MNS Shivsena Alliance: Will Raj-Uddhav come together? Aditya Thackeray's open applause for 'MNS'!
Aditya Thackeray On Devendra Fadnavis : ‘भाजप मित्रपक्षांना जवळ करतात, पण बदनाम करून सोडतात’ – आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारातील अनियमिततेचे आरोप आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर, आता शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांच्यावरील आरोप
पुणे शहरातील मुंढवा परिसरातील कोरेगाव पार्कजवळची 40 एकर महार वतन जमीन ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ (ज्यात पार्थ पवार भागीदार आहेत) या कंपनीला 1800 कोटी रुपयांऐवजी केवळ 300 कोटी रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, या व्यवहारात सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याचाही गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
या प्रकरणात पुणे तहसीदारासह दुय्यम निबंधकांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईवर बोट ठेवत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला.”या प्रकरणात दोन गोष्टी आहेत. एक मी ऐकले की, यामध्ये कोणत्यातरी रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. जर एवढी मोठी गोष्ट असेल, हा घोटाळा खरा असेल तर या एका निलंबनाने हा विषय संपणार आहे का?”
भाजपवर टीका
यासोबतच, आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना लक्ष्य करत भाजपवरही निशाणा साधला.”आणि दुसरी गोष्ट अशी की, भाजपाच्या मित्रपक्षांना आता कळले असेल की, ते जवळ तर घेतात पण बदनाम करून सोडतात.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असली, तरी विरोधकांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ प्रशासकीय कारवाई पुरेशी नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…