Parth Dada Foundation : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार वाढदिवसा निमित्त पार्थ दादा फाउंडेशन तर्फे सॅनिटरिन नॅपकिन पॅड, व मुलांना खाऊ चे वाटप.
उरण : उरण तालुक्यात जनविश्वास सप्ताह साजरा करण्यासाठी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातील रानसई येथील सहा आदी वासी वाड्यावर येथील आदिवासी महिला भगिनींना सॅनिटरिन नॅपकिन चे तसेच मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी सॅनिटारीन नॅपकिन पॅड आपल्या आरोग्या साठी कसे फायद्याचे आहे याचे महत्व सांगितले. पूढे महिलांना संबोधताना म्हणाले की मुख्य मंत्री माझी लाडकी बहिण योजना, आता मुलींना अथवा मुलांना वडिलांच्या अगोदर आईचे नाव लिहावेच लागेल तसा कायदेशीर शासकीय आदेश महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सन्मानिय अदितीताई तटकरे यांनी सभागृहात पारीत केला. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.21ते 35 वय वर्ष गटातील तरुणांना उच्च शिक्षणा साठी 10000 दर महा विद्यावेतन दिले जाणार. 35 हजार दिव्यांग बांधवांना घरकुल देण्यात येणार. लेक लाडकी अशा विविध शासकीय योजनाची माहिती देण्यात आली . तरी अशा या विविध शासकीय योजनाचा फायदा आदी वासी बांधवानी जरूर घ्यावा असे आवाहन वैजनाथ ठाकूर यांनी आदी वासी बांधवाना केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पार्थ दादा फाऊंडेशन ने विशेष मेहनत घेतली. यावेळी आदी वासी महिलानी बोलताना सांगितले की आमच्या हाताला काही रोजगार दया, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण दया जेणे करून आम्ही स्वतः ते बनवून आम्ही आमच्या पायावर उभे राहू यासाठी सॅनिटारीन नॅपकिन पॅड बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्या साठी लागणारे साहित्य पुरवावे अशी मागणी आदी वासी बांधवानी पार्थ पवार फाउंडेशन कडे मागणी केली आहे. सदर कार्यक्रमाला त्रिकाळ पाटील ( घारापुरी गाव अध्यक्ष, मोहन उघडा, प्रदिप खैरे, साहिल ठाकूर आदी सह आदी वासी बांधब मोठया संख्येने उपास्थित होते.