Part Time Job Fraud : इन्स्टाग्राम ‘आयडी’ पार्ट टाईम जॉब जाहिरात; डोंबिवलीच्या महिलेचे 3 लाख लुटले!
•पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली महिलेची फसवणूक, महिलेला तीन लाखाचा गंडा
डोंबिवली :- डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेला सायबर टोळ्यांनी इंस्टाग्राम आयडी वर पार्ट टाईम जॉब म्हणून हॉटेल रिव्ह्यू देण्याकरिता गुंतवणूक करून नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 3 लाख 2 हजार 500 रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या एका महिलेला इंस्टाग्राम आयडी वर पार्ट टाइम जॉब म्हणून हॉटेलला रिव्ह्यू देण्याकरिता जेवढी रक्कम गुंतवला त्यावर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखविले होते. महिलेला तीन लाख 2500 रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी सांगून परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाले हे लक्षात आलं आहे. त्यानंतर त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे हे करीत आहे.