Parliament Session 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित खासदार शपथ
Parliament Session 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (24 जून ) खासदार म्हणून शपथ घेतली.
ANI :- भाजप खासदार आणि प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत.भाजपचे खासदार आणि प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पदाची शपथ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पीएम मोदी शपथ घेतल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देताना दिसत आहेत, तर राहुल गांधीही त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधींनी हातात संविधानाची प्रत धरली आहे.कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी माहिती दिली की राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
राज्यमंत्री शंतनू ठाकूर, सुरेश गोपी, अजय टमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भगीरथ चौधरी, संजय सेठ, दुर्गादास उईके, रक्षा खडसे, सुकांतो मजुमदार, सावित्री ठाकूर, तोखान साहू, राजभूषण चौधरी, हरिनाथ चौधरी, मलेशू राजू, हरिनाथ चौधरी, नीरव पाटील बांभनिया आणि मुरलीधर मोहोळ यांनी कनिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व घेतले.