क्राईम न्यूजमुंबई
Trending

Parambir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना क्लिनचीट; सीबीआयने न्यायालयात दिला अहवाल

Parambir Singh: खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणात क्लिनचीट; पाच कोटींच्या आरोपांना मिळाली चाप

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांना अखेर खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) क्लिनचीट दिली आहे. सीबीआयने तपास पूर्ण करून आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून, त्यात कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परमबीर सिंह यांच्यावर सुमारे 5 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हाही कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. हे दोन्ही प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती. तपासाअंती दोन्ही प्रकरणांत परमबीर सिंह निर्दोष असल्याचा निष्कर्ष निघाला.

पाच कोटींच्या खंडणी प्रकरणाचा तपशील

2018 मध्ये ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांना यूएलसी घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. त्या काळात 4 कोटी 68 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांचे पुतणे शरद यांनी केला होता. या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह पराग मनेरे, सुनील जैन, संजय पुनामिया आणि मनोज घोटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील सुनील आणि संजय यांना मुंबई पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनीही परमबीर सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री व गृहखात्याला पत्र पाठवले होते.

या पार्श्वभूमीवर दोन्ही गुन्ह्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्यात आला होता. सीबीआयने तपासादरम्यान कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत, असे स्पष्ट करत परमबीर सिंह यांना क्लिनचीट दिली आहे. याबाबतचा अधिकृत अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

यातील सुनील आणि संजय यांना मुंबई पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनीही परमबीर सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री व गृहखात्याला पत्र पाठवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0