क्राईम न्यूज

Panvel Sex Racket : पनवेलमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा — पाच पीडित महिलांची सुटका

Panvel Sex Racket Busted News : प्रशांत लॉजवर छापा टाकून मॅनेजर व वेटर अटकेत; महिला पुरवणारा फरार

पनवेल :- पनवेलच्या हृदयस्थानी असलेल्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या प्रसिद्ध ‘प्रशांत लॉजिंग’मध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक अवैध वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Panvel Sex Racket Busted News

30 मे च्या रात्री, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पोलीस पथकाने छापा टाकून 5 महिलांची सुटका केली, ज्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.

मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाची यशस्वी कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विशेष मोहीम

ही मोहीम मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त), संजय येनपुरे (सह आयुक्त), दीपक साकोरे (अपर आयुक्त – गुन्हे), व अमित काळे (उप आयुक्त – गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.

शुक्रवारी (30 मे) रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ बनावट ग्राहक तयार करून लॉजमध्ये पाठवले. ग्राहकाने ठरल्याप्रमाणे सिग्नल दिल्यानंतर, २२:२३ वाजता पोलिसांनी गनिमी काव्याने लॉजवर धाड टाकली.

त्या क्षणी लॉजमधील वेटर अरुणकांत चतुर्वेदी महिलांना ग्राहकांसमोर मांडत होता आणि मॅनेजर राजू दास व्यवहार ठरवत होता. हे सर्व करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.तपासात उघड झाले की, मयुर डावरे नावाचा दलाल महिला पुरवण्याचे काम करत होता, तर लॉजचा मालक अरुण शेट्टी या सर्व कारवायांना मूक संमती देत होता. हा लॉज काही काळापासून देहव्यापाराचे अड्डे म्हणून वापरला जात होता.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात Panvel Police Station याप्रकरणी नोंदवण्यात आला असून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींना २ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मयुर डावरे आणि अरुण शेट्टी फरार आहेत.

या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला असुन, पुढील तपास सुरु आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago