क्राईम न्यूजमुंबई

Panvel Robbery News : चोरट्यांचा धुमाकूळ ; पनवेल शहरात एकाच पहाटे सहा दुकाने फोडली

Panvel Robbery News : पनवेल शहरात शनिवारी (27 जुलै ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत, शहरातील सहा दुकानाचे कुलूप तोडून लाखों रुपये लंपास केल्याचा अंदाज

पनवेल : पनवेल शहरात शनिवारी (27 जुलै) पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच वेळी सहा दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.‌ Panvel Robbery Case पनवेलमधील तक्का शहरात ही घटना घडली आहे.जवळपास 6 दुकानांचे शटर उचकटून लाखों रुपयांवर डल्ला मारल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही चोरी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झाली असून, तीन चोरट्यांनी संगनमत करून ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी 4 मेडिकल, 1 दूध डेअरी आणि 1 पान टपरीचे शटर उचकटून चोरी केली आहे. Panvel Crime News

पनवेलकर गाढ झोपेत असताना हे सर्व प्रकरण घडल्याचे समोर आले आहे, आज पहाटे तीन चोरट्यांनी एकत्र येऊन ही चोरी केली. या चोरीमध्ये तिन्ही चोरट्यांनी एकत्र येऊन दुकानाचे शटर उचकटले आणि त्या तीन चोरांपैकी एक चोर आत जाऊन चोरी करून परत यायचा अशा पद्धतीने चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलीस सीसीटीव्ही मदतीने कोणत्या चोराचा चेहरा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय का? हे चोर कोणत्या मार्गाने आले या सर्वांचा तपास पनवेल पोलीस Panvel Police Station करत आहे. Panvel Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0