Panvel Raigad Singer Ganesh Bhagat : पनवेल रायगडचे नामवंत गायक कै गणेशजी भगत यांचे निधन .
गडब (अवंतिका म्हात्रे) : पनवेल रायगड मधली नामवंत गायक कै. गणेशजी भगत.यांचे दि.१२जानेवारी सकाळी ८ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. Raigad Singer Ganesh Bhagat त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली बायको भाऊ बहीण असा मोठा पारिवार आहे . संगीत क्षेत्रा मध्ये गणेशजी भगत उर्फ दादा यांनी जवळ जवळ ३० वर्ष संगीत क्षेत्रात आपलं योगदान दिलं.. एक हजाराहून अनेक लोकगीते व कोळी गीते त्यांनी गायली.. गेली अनेक वर्ष दादांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अपाल्या सुमधुर आवाजाने ते रसिकांना मंत्र मुग्ध करत होते. कोळीबाणा..कलाकार.. वेसावकर आणि मंडळी अशा मोठ्या वाद्यवृंद या मध्ये दादांनी कामे केली होती.. पनवेल व रायगड मध्ये कला क्षेत्रा मध्ये त्यांचं खुप नावं होत..त्यांच्या अंत विधीला अनेक दि्गज कलाकार यांनी आपली उपस्थिती दाखविली… असा गायक कलाकार व निर्माता होणे नाही… संगीत क्षेत्रा मधल पनवेल मधली एक हिरा हरपल्याने संपूर्ण कोळी बांधवाना त्यांची उणीव भासणार आहे .