•नितीन पाटलांनी उघडले खाते; शेकाप, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या माघारीमुळे भाजपची निवडणुकीपूर्वीच मोठी ‘बाजी’
पनवेल | पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयाचा गुलाल उधळला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नितीन पाटील ठरले पहिले ‘बिनविरोध’ नगरसेवक
भाजपच्या या विजयाची नांदी रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी केली. प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून ते निवडणूक लढवत होते. या प्रभागातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव बाद झाला. प्रतिस्पर्धी उमेदवारच रिंगणात नसल्याने नितीन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
अर्ज माघारीचे सत्र आणि 8 जागांचा आकडा
आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी आपली शस्त्रे म्यान केली. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 7 जागांवर भाजपचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, पनवेल महापालिकेत महायुतीचे 8 नगरसेवक आता अधिकृतपणे सभागृहात जाणार आहेत.
बिनविरोध निवडून आलेले भाजपचे ‘विजेते’
१) नितीन पाटील
२) रुचिता लोंढे
३) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
६) ममता प्रितम म्हात्रे
७) स्नेहल ढमाले
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…