क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Nalasopra MD Drugs News : नालासोपाऱ्यात ‘एमडी’चा धडाका! पेल्हार पोलिसांचे कान टोचले; वनकोटींना निलंबनाचा दणका!

Mira Bhayandar Police On MD Racket : मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तांचा थेट दणका; “पोलिसच झोपले तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?”

नालासोपारा :- नालासोपारा परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेला कोट्यवधी रुपयांच्या मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. या भागातील पेल्हार पोलीस ठाण्याचे Pelhar Police Senior PI Suspended वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना आयुक्त निकेत कौशिक यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचा दणका दिला आहे. Nalasopra Crime News

पोलीस दलात खळबळ

मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून हा अमली पदार्थांचा डोंगर उघडकीस आणला होता. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच, जवळच्या अंतरावर हा कारखाना अनेक महिन्यांपासून फुलत असताना स्थानिक पोलिसांना याची खबर नसणे, हे प्रशासकीय अपयश मानले जात आहे.

या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून, “एमडीचा धंदा कोणाच्या छत्रछायेखाली फुलला होता?” असा सवाल शहरात गाजू लागला आहे.

कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह, रसायनं आणि उपकरणे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अड्ड्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या रकमेचा खेळ लपलेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांकडून संताप व्यक्त

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गुन्हेगार पकडले गेले, पण पोलिसच जर झोपले असतील, तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वनकोटींवरील निलंबनानंतर पेल्हार पोलीस ठाण्यात सध्या शांतता पसरली असून, काही अधिकारी आता ‘एमडी’च्या उर्वरित प्रकरणांचा तपास आणि पाठपुरावा करण्यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0