मुंबई

Panvel Police News : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने परिमंडळ 2 मधील पोलिसांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाणेे Panvel Police Station या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल Rotrary Club Of Panvel Central यांचे माध्यमातून परिमंडळ 2 अंतर्गत सर्व पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार व त्याचे कुटुंबियांसाठी शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल, डॉ.डी.वाय हॉस्पिटल ब्लड बॅंक, नेरूळ नवी मुंबई तसेच, पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित आरोग्य शिबिरामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय असे एकूण 163 जणांची पूर्ण आरोग्य तपासणी ( मधुमेह, रक्तदाब, हाडांची घनता, इ सी जि, फुफुसांची तपासणी, डोळे तपासणी, दात तपासणी, रक्त तपासणी तसेच रक्तदान शिबीर ) करून मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश पोटे व प्रथम क्लब नारी वैशाली पोटे या उभायंतासह पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल पाटील यांचे सह एकूण 18 जणांनी रक्तदान केले.
सदर शिबिराचे उदघाट्न पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांनी केले. या प्रसंगी पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील साहेब, पोलीस निरीक्षक भगत व पोलीस निरीक्षक शेलकर उपस्थित होते. Panvel Police Latest News

आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य विषयक तपासणी करून मार्गदर्शन करणे करिता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे वतीने पनवेल, नवी मुंबई विभागातून एकूण 33 प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते. Panvel Police Latest News

सदर शिबीर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे माजी अध्यक्ष व सध्या चे मेडिकल संचालक डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोटरी सदस्य,एन्स, अनेट्स यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. Panvel Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0