पनवेल / जितिन शेट्टी :- देशात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. Navi Mumbai Police नवी मुंबई पोलिसांतर्फेही सर्वत्र गस्ती पथक तैनात असून विविध ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथकाने पाहणी केली. पनवेल शहर पोलिस ठाणे, महानगर पालिका, मुसलमान नकाका, कोळीवाडा, उरण नाका, वडघर, सुखम हॉस्पिटल, करंजाडे सेक्टर ४, ५, गवळीवाडा, चिंचपाडा सेक्टर १,२ , चिंचपाडा ब्रिज, जेएनपीटी रोड मार्गे कर्नाळा स्पोर्टस ॲकॅडमीकडून साईनगर आणि पुन्हा पनवेल शहर पोलिस ठाणे Panvel Police Station अशी पायी गस्त घालण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्यासह १ पोलिस निरिक्षक, ५ सहायक पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक यांच्यासह महिला व पुरुष अंमलदार सहभागी झाले होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…