मुंबई
Panvel News : युवासेना उत्तर रायगड पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकार्यांन कडून पनवेल पोलिस उप आयुक्तांना – ड्रग्ज आणि नशायुक्त अमलीपदार्थ विरोधात कठोर कारवाही करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
पनवेल : पनवेल खारघर उरण आणि रायगड जिल्ह्या लगत असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणाऱ्या गांजा, चरस, एमडी, तसेच इतर अंमली पदार्थांन संदर्भात आज युवासेना उत्तर रायगड पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी पनवेल पोलिस उपायुक्त श्री.विवेक पानसरे साहेब यांना निवेदन देत अवैध रित्या गांजा आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली तसेच अवैध्य नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिस उपायुक्त श्री.पानसरे साहेब यांनी दिले. ह्यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय सचिव श्री.रुपेशदादा पाटील , शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. रामदासजी शेवाळे साहेब तसेच युवासेना पनवेल आणि उरण विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते